Newsletter 7

October – November – December 2012

Season has changed and cold waves are spreading their effect everywhere. Sunrays make their way through the chilled winter mornings to reach the land.

थंडीची हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या लाटांनी भरलेल्या वातावरणातून सूर्य किरणांना जमिनीपर्यंत पोहोचताना बघणे हा एक वेगळाच अनुभव आहे. 

Meet a Bird

Common Name: Crowpheasant / Greater Coucal   भारद्वाज

Description:It is a big bird with chestnut wings. Its food contains caterpillars, lizards, insects, birds’ eggs etc. In addition to forest areas, it is also seen near human habitations with good tree cover.

कावळ्यापेक्षा मोठा असणारा हा काळा पक्षी त्याच्या बदामी रंगाच्या पंखांमुळे वेगळा दिसून येतो. विविध प्रकारच्या अळ्या, सरडे, कीटक, पक्ष्यांची अंडी हे याचे खाद्य आहे. जंगलाव्यतिरिक्त ज्या मनुष्य वस्तीजवळ बऱ्यापैकी झाडे असतात अशा ठिकाणीसुद्धा हा पक्षी आढळतो.

Organic Farming

With the growing awareness regarding organic food, people prefer to have collection of various fruits and vegetables on their farm. This helps in getting organic fruits and vegetables for their own consumption. This gives a totally different level of satisfaction altogether. The adjacent design is prepared for one of our projects with the above view.

स्वतःच्या शेतात तयार झालेली सेंद्रिय फळे व भाज्या खाण्यात एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळते. आमच्या अशाच एका प्रकल्पाचे डिझाईन येथे दाखवले आहे.

 Nature Trails (निसर्ग भ्रमण )

Various groups have experienced and enjoyed the Nature trail so far. Glimpses of some of the trails of this season are given here.

सुट्टीचा हंगाम सुरु होताच निसर्ग भ्रमणासाठी पर्यटक येऊ लागतात. या वर्षी आत्तापर्यंत झालेल्या निसर्ग भ्रमण कार्यक्रमांची झलक फोटोच्या स्वरुपात देत आहोत.

Zoology Students of R. D. National College, Bandra, Mumbai participated in the nature trail. Noticeable discipline of students on trail helped them observe more birds.

This educational study visit was organized by Invitation Travel. E-mail: invitationtravel@hotmail.com  Contact Persons: Mr. Pramod Meshram – 98207 55660 & Ms. Dipali Meshram –  98207 51737 

Tourists staying at Naad Beach Resort, Murud participated in nature trail. The trails at this resort are promoted by the owner Mr. & Mrs. Bal. (Mobile  9158997980) Website: www.naadbeachresort.com 

Students of Saraswati Vidyamandir English Medium School, Dapoli  on trail. Members of ‘Nature Club’ of this school got an opportunity to participate in nature trail. Students got to see various birds like Iora, Drongo, Leafbird, Bulbuls etc. They also enjoyed various components of nature like spiders, butterflies, plants, insects etc.

Enthusiasm and interest of students and teachers was worth mentioning.

Contact details of School: Website: www.svems.in  Contact No. 02358 690165

January – February – March 2012

With a view to spread awareness about nature & its conservation, we are pleased to announce launch of…. Printed bookmarks of biodiversity at & around Dapoli – A set of 12 bookmarks is available which contains photos showing glimpses of biodiversity.  Nature Colouring Activity Booklet for children – In this colouring booklet, all the sketches of various components of nature are drawn by Jilpa and colour guidelines are given for each. Upon colouring the object, it will be similar to the one in nature. This will help the children relate to these components of nature.

पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्यासाठी २ नवीन वस्तू उपलब्ध करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. छापील बुकमार्क – (बुकमार्क म्हणजेच पुस्तकात ठेवायची खूण ) हा १२ बुकमार्कचा सेट असून दापोली परिसरातील जैवविविधतेचे फोटो घेऊन छापलेले आहेत. “निसर्गातील घटकांची चित्रे रंगवा” ही पुस्तिका. ही पुस्तिका विशेष करून मुलांमध्ये निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने तयार केली आहे. त्यातील सर्व चित्रे जिल्पाने स्वतः काढलेली आहेत. प्रत्येक चित्राला रंगवण्यासाठी मार्गदर्शन दिलेले आहे. रंगवून पूर्ण होणारे चित्र आणि निसर्गातील ते घटक यामधील साम्य लक्षात आल्यावर मुलांची निसर्गाच्या त्या घटकाशी ओळख होईल. Both the above mentioned articles are available with us for sale. Soon we will also be launching greeting & stickers depicting biodiversity of DAPOLI. वर नमूद केलेल्या दोन्ही वस्तू आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवकरच आम्ही दापोलीतील जैवविविधतेची झलक दाखवणारी शुभेच्छा पत्रे आणि स्टिकर्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहोत.

Meet a Plant Common Name: Kumbhi कुंभी Botanical Name: Careya arborea Family: Lecythidaceae Description: Medium to large deciduous tree found in forests throughout India. Flowers are white in colour. Flowering season:  February – March हा मध्यम ते उंच वाढणारा पानगळी प्रकारचा वृक्ष आहे. त्याची पांढरी फुले फेब्रुवारी – मार्च महिन्यात दिसतात.

Nature trails (निसर्ग भ्रमण ) Further to good response for our nature trail activity, we are now planning to organize declared nature trails & mangrove walk at Anjarle. We will be interacting with the tourists on Saturday evening and taking booking of interested persons. Of course this will depend on our availability as well as response from tourists. Charges will be on per participant basis. For more details, please contact us.

आमच्या निसर्ग भ्रमण कार्यक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आम्ही आंजर्ले गावात पूर्वघोषित निसर्ग भ्रमणाचे कार्यक्रम घेण्याचा विचार करत आहोत. यासाठी आम्ही आंजर्ले येथे राहणाऱ्या पर्यटकांशी शनिवारी सायंकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. किंवा हे पर्यटकसुद्धा आमच्या केंद्रात येऊन आमच्याशी संपर्क साधू शकतात. इच्छुक व्यक्तींची नावे नोंदवून घेवून त्यांच्यासाठी रविवारी सकाळी आंजर्ले येथे हा कार्यक्रम घेऊ. अर्थात हे आमच्या उपलब्धतेवर तसेच पर्यटकांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. ह्याचे आमचे मानधन हे प्रति व्यक्ती असे असेल. अधिक माहितीकरिता कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

Environment Conservation (पर्यावरण संवर्धन) Turtle Festival (कासव महोत्सव) Sahyadri Nisarga Mitra Chiplun started marine turtle conservation project since the year 2002 in village Velas. Since then their consistent efforts have resulted in successful protection to nests & safe release of hatchlings in the sea. Along with this project the organization is also working in the area of conservation of vultures & white bellied sea eagle. To know more about this valuable work, you may visit www.snmcpn.in

चिपळूणची सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था २००२ पासून वेळास ह्या गावात कासव संवर्धनाचे काम करत आहे. त्यांच्या अभ्यासावर आधारित शास्त्रीय पद्धतीने लोकसहभागातून केलेल्या प्रयत्नांमुळे ते कासवांच्या अंड्यांना संरक्षण देण्यात आणि पिल्लांना सुखरूप समुद्रात सोडण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच ही संस्था गिधाडे व समुद्र गरुड ह्यांच्या संवर्धनासाठीदेखील कार्यरत आहे. त्यांच्या ह्या महत्वपूर्ण संवर्धन कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण त्यांची वेबसाईट बघू शकता……. www.snmcpn.in

October – November – December 2011

कृषी प्रदर्शन, किसान २०११ – दि. १४ – १८ डिसेंबर २०११, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी, पुणे – नाशिक हायवे, भोसरी जवळ, पुणे ( सकाळी १० ते संध्या ६ ) ….अधिक माहितीकरिता पहा  www.kisan.in

KISAN 2011 (At Pune, from 14th – 18th December):  This exhibition is organized for the benefits for Farming community since past 18 years. This is an opportunity to gain knowledge about diverse segments of agriculture under one roof.  Visit to this event may be beneficial to you for your Agro Enterprise. For more details visit KISAN website www.kisan.in

—————————————————————–

Meet a Plant  

Common Name – Wagati वागाटी 

Botanical Name – Moullava spicata

Family – Caesalpiniaceae

Description – It is a large woody climber occasionally seen in Konkan

Flowering season – December – February

कोकणातील जंगलात आढणणारा हा महाकाय वेल आहे. त्याचे केशरी – लाल तुरे हिरव्यागार पानांमधून उठून दिसतात. फुले साधारणपणे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान बघायला मिळतात.

——————————————————–

Meet a Butterfly – Common Lascar

 This butterfly can be easily noticed due to its prominent orange bands.  It is

mainly seen in forested areas &  sometimes outside forested areas. It is seen from March to December.

केशरी रंगाच्या पट्ट्यांमुळे उठून दिसणारे  हे कॉमन लास्कर फुलपाखरू.

————————————————————–

Nature Trails

Participants of nature trail organized by Naad Beach Resort, Murud (www.naadbeachresort.com).  The group got to see many butterflies & birds.

Mr. & Mrs. Bal of Naad Beach Resort (9158007204 / 9158997980) took keen interest in giving this activity to the tourists staying at their resort.

नाद beach resort  मुरुड (ता.  दापोली)   यांनी त्यांच्याकडील पर्यटकांसाठी निसर्ग भ्रमण कार्यक्रम आयोजित केला होता.  त्या  कार्यक्रमात सहभागी झालेल्या  पर्यटकांना  हा कार्यक्रम खूपच आवडला.

———————————————————-

Organic Farming – Spices & condiments

Along with various traditional crops, farmers in Konkan are now cultivating Turmeric & Ginger.

Cultivation at Mr. Deepak Mahajan’s farm, Kolthare, Taluka – Dapoli.

विविध पारंपारिक पिकांबरोबरच कोकणामध्ये आता हळद आणि आले ही पिके यशस्वीपणे घेता येतात. दापोलीतील कोळथरे या गावी श्री. दीपक महाजन यांच्या शेतातील  हळद आणि आले लागवड.

——————————————————

Landscaping

While beautifying the area around a house (as seen in photographs of one of our
projects), a walkway is planned in such a way as to take a walk in the whole area.

आमच्या एका प्रकल्पातील घरासभोवतालच्या  बागेचे आरेखन व तयार होत असलेली बाग. या बागेमध्ये फिरण्यासाठी paver blocks वापरून  एक  मार्ग तयार केलेला आहे.

———————————————–

Environment Conservation Series – Mangroves

Mangroves are found in coastal areas in tropical & subtropical region. They serve as important buffer between sea & land. They lessen the impact  of storms, reduce erosion & increase sedimentation. They have various adaptations to survive in the muddy soil & salty water.

We need to conserve this ecosystem because in addition to various benefits, protection of shore line is the most important one.

समुद्र किनारी आढळणारी खारफुटीची वने ही एक महत्वाची परिसंस्था आहे. यालाच खाजण असेही म्हणतात. या वनांमुळे समुद्र किनारपट्टीचे रक्षण होते, त्यामुळे या वनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

July – August – September 2011

Monsoon season is well set in and many heavy showers show their strength and beauty. Lush green colour of the landscape everywhere fills eyes with a soothing feeling. Rainbow of monsoon flowering plants splashes during these months.  Farming activity is also at its peak.

कधी पावसाची रिमझिम तर कधी मोठया सरी…….. त्यामुळे हवेत एक वेगळाच गारवा जाणवायला लागतो. जागोजागी उगवलेल्या गवतामुळे सभोवतालचा परिसर हिरवा गालीचा अंथरल्यासारखा भासतो.  विविध रानफुलांच्या माध्यमातून निसर्ग विविध रंगांची उधळण करताना पाहून त्याचा अनुभव घ्यावासा वाटतो.

Meet a Plant

Common Name: Haldu  हेदू

Botanical Name: Haldina cordifolia (Adina c.)

Family: Rubiaceae

Description: Haldu is a large deciduous tree occasionally seen in Konkan

 Flowering season: July – August

हेदू हा जंगलातील उंच वाढणारा पानगळी प्रकारचा वृक्ष आहे. याला पावसाळ्यात पिवळ्या रंगाची फुले येतात. छोट्या गोंड्यासारखी ही फुले फारच मोहक दिसतात.

Meet a Bird

Common Name: Golden Oriole    हळद्या

Description: Golden yellow coloured bird with black wings & tail. Female is dull coloured. Found throughout the country; even in towns. Mainly feeds on insects, Ficus & other fruits.

नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा  व शेपटीचा रंग काळा असतो. मादी किंचीत फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते.   विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. विणीचा हंगाम  – एप्रिल ते जुलै.

Nature trails

Monsoon has its own beauty which is beyond comparison.  One can enjoy the splendid colours of monsoon flora during this season. This is also the season when one gets to see variety of life like caterpillars, insects, butterflies, moths, grasshoppers, spiders etc.

पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पतींबरोबरच अनेक प्रकारचे कीटक व फुलपाखरे त्यांच्या अनेकविध रंगांनी आपल्याला अचंबित करतात.  पावसाळ्यातील निसर्ग भ्रमंतीमध्ये आपल्याला हे सर्व अनुभवता येऊ शकते.

Organic Farming

Many types of vegetables can be grown during monsoon season.

Earthworms are vital components of organic farming. During monsoon, they can be seen on surfaces of soil on organic farms. Vermicompost & vermiwash are the two products which help in healthy growth of crops. Organic farming nurtures native species of earthworms.

पावसाळ्यात शेतामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करता येते.  

गांडूळ हा सेंद्रिय शेतीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात गांडूळ जमिनीवर बघायला मिळतात. गांडूळ खतामधून पिकांना आवश्यक  असे बरेच अन्न घटक मिळतात.

Landscaping

While designing any area for enhancing its beauty we also consider its optimum utility.  The design seen in the adjacent photo was prepared for Mrs. Rashmi Luktuke, village Gavhe, Dapoli.

घरा सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करताना विविध प्रकारची फुलझाडे व हिरवळ तसेच वनवृक्ष यांचा समावेश केलेला आहे. कुटुंबासाठी लागणारी फळे व भाजी याची गरज काही  प्रमाणात  भागविण्यासाठी फळझाडे व भाजीपाला लागवड असलेली परसबागही आहे.

 

Environment Conservation Series

Flowing muddy water is a common scene during monsoon in towns & villages. This muddy water carries with itself the fine particles of soil. This is in fact the fertile part of land which is lost by soil erosion. Suitable farming methods like bunding, contour cultivation, planting of trees and grasses can help in reducing soil erosion up to a large extent.

पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण वाहून जातात व जमिनीची धूप होते. विविध प्रकारची बांधबंदिस्ती, वृक्ष व गवत लागवड तसेच शेतीतील मशागतीची कामे उताराच्या आडव्या रेषेत केल्याने जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.