World Wetlands Day 2017

World Wetlands Day 2017 – 2 February 2017   

Greetings on the occasion of World Wetlands Day 2017! Children can colour this wetland ecosystem and celebrate this day. This is just an activity and not a competition. It is to spread awareness about wetlands.

View of Mangrove at Anjarle creek

Schools can also participate by colouring this sketch. You can take photos of children colouring the sheet and send it to us along with name of school, village / city and name of teacher who conducted the activity.

You can e-mail the photo / scanned copy of coloured sketch to us. (our e-mail – naturetrails@krishivarada.in )

Few sketches received upto 28 February 2017 will be published on Facebook page of Nature Colouring Activity and / or our blog.

जागतिक पाणथळ जागा दिवस २ फेब्रुवारी २०१७

जागतिक पाणथळ जागा दिवस २०१७ निमित्ताने आपल्याला शुभेच्छा!  वर्षभर किंवा वर्षातील काही महिने पाणी असलेल्या जागा उदा. सरोवर, तलाव, दलदल असलेली जागा, कोकण किनारपट्टीवरील खारफुटीची वने (खाजणवने) इत्यादींचा पाणथळ जागांमध्ये समावेश होतो.

Stilt roots of Rhizophora show adaptation of Mangroves
शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी सोबतचे पाणथळ जागेचे चित्र रंगवून हा दिवस साजरा करू शकतात. ही  स्पर्धा नसून पाणथळ जागा व त्यांचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठीच एक ऐच्छिक उपक्रम आहे. विविध शाळाही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ शकतात. शक्य झाल्यास विद्यार्थी चित्र रंगवताना किंवा रंगवलेली चित्रे हातात घेऊन विद्यार्थी व त्यांचे शिक्षक असे १ – २ फोटो आम्हाला खालील ई-मेलवर पाठवा.  शाळेचे नाव, शिक्षकांचे नाव व सहभागी विद्यार्थ्यांची संख्या आणि इयत्ता ही  माहिती २८ फेब्रुवारी  २०१७ पूर्वी पाठवा. शक्य तेवढे फोटो व शाळेचे नाव इ . आम्ही आमच्या ब्लॉग वर किंवा / फेसबुक पेजवर शेअर करू ज्यायोगे पाणथळ जागांबद्दलची जाणीव जागृती व त्याचे महत्व या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आणि इतरही अनेकांपर्यंत पोहचू शकेल. (ई -मेल – naturetrails@krishivarada.in)  

Sketch for colouring is available on following link of our website  http://bit.ly/2jWtjod

रंगवण्यासाठीचे चित्र आमच्या वेबसाईट वरील पुढील लिंकवर उपलब्ध आहे  http://bit.ly/2jWtjod

Cock’s Comb कुर्डू

Celosia argentea – Silver spiked cock’s comb (Amaranthaceae)

One of the monsoon flora, this plant flowers during August to November. The spikes attract butterflies and bees. It can be seen on hill slopes as well as along road side.

img_0521

It is a fast growing plant which can be seen in large numbers and clusters. It adds to the beauty of the road when grows along roadside.

wp_20160915_12_47_04_pro

कुर्डू ही पावसाळ्यात उगवणारी वनस्पती असून डोंगर, डोंगर उतार तसेच रस्त्याच्या कडेलाही बघायला मिळते. याच्या फुलांचे छोटे तुरे ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात बघायला मिळतात. या तुऱ्यांवर फुलपाखरे तसेच मधमाश्या उडताना दिसतात.

img_8206

Butterfly slide show and activity 2015 – 16

हसत खेळत निसर्ग परिचय कार्यक्रम – फुलपाखरे

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकातील फुलपाखरांचा जीवनक्रम या विषयावर आधारित स्लाईड-शो व कार्यानुभव कार्यक्रम. २०१५ – १६ या शैक्षणिक वर्षातील आमचा हा पहिला कार्यक्रम आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर दापोली येथे दिनांक १६ जुलै २०१५ रोजी पार पडला.

Learn with Fun Nature Education Activities – Butterflies

Slide show and activity on Butterflies – this programme is based on a lesson about life cycle of butterflies in text book of Std 4. We conducted the first program of the academic year 2015 – 16 at A. G. K. Sohani Prathamik Vidyamandir, Dapoli on 16 July 2015.

lectures ppt 2015

पाठ्यपुस्तकातील बिबळ्या कडवा या फुलपाखराबरोबरच लेपर्ड, कमांडर व चॉकलेट अल्बाट्रोस या फुलपाखरांचा जीवनक्रम आम्ही विद्यार्थ्यांना स्लाईड-शोच्या माध्यमातून दाखविला. तसेच दापोली परिसरात दिसणाऱ्या काही फुलपाखरांचे फोटोही त्यांना दाखविले व फुलपाखरांचे पर्यावरणातील महत्वही समजावून सांगितले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक फुलपाखराचे चित्र रंगवून त्याचे बोटावर उडणारे फुलपाखरू तयार केले.

Along with the life cycle of Striped tiger as mentioned in the text book, the students were shown life cycles of Leopard, Commander and Chocolate Albatross butterflies. Additionally, various butterflies seen at and around Dapoli were shown through slides and importance of butterflies in environment was explained.

Slide show was followed by colouring of butterfly and making of finger puppet.

Butterfly – फुलपाखरांविषयी एक नाटिका – 6 January 2015

During Annual Day Function of Aadarniya Gopal Krishna Sohani Prathamik Vidyamandir Dapoli, a small play on Butterfly was conducted. The concept was to create and spread awareness about butterflies. The anchor introduces the theme and few butterflies come around and he talks to these butterflies and they reply to his queries. Some of them also tell about their food plants. In the end the anchor gives a message to be always happy like these colourful butterflies and take life positively.

We are thankful to the Principal of school as well as Shri Gamre Sir and other teachers for accepting this concept and for their co-operation for the success of this short play.

DSC_0202

फुलपाखरू या विषयावरील नाटिका

दिनांक ६ जानेवारी २०१५

आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिराच्या स्नेहसंमेलनात फुलपाखरांविषयी जागरुकता वाढावी व काही फुलपाखरांशी लोकांची ओळख व्हावी या उद्देशाने एक नाटिका बसवण्यात आली होती.

ही संकल्पना जेव्हा आमच्या मनात आली तेव्हा आम्ही प्रथम त्याची रूपरेषा ठरवली आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांशी याविषयी बोललो. त्यांनाही ही संकल्पना आवडली. जिल्पाने या नाटिकेचे संवाद लिहीले आणि त्यात थोडेफार सुयोग्य असे बदल करून खूप कमी वेळात शाळेतील शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून त्याची तयारी करून घेतली.

याची संकल्पना अशी होती की निवेदक त्याच्या आगळ्यावेगळ्या मित्रांना प्रेक्षकांच्या भेटायला घेऊन येतो. हे आगळेवेगळे मित्र म्हणजे आपल्या परिसरात दिसणारी काही फुलपाखरे. या फुलपाखरांबरोबर निवेदक संवाद साधतो …… ज्यांच्या उत्तरांच्या माध्यमातून फुलपाखरे स्वतःची ओळख करून देतात. काही फुलपाखरे त्यांच्या आवडीची झाडे प्रेक्षकांना सांगतात.

यामध्ये कॉमन बेरन, ग्रास यलो, जेझेबल, प्लेन टायगर, चॉकलेट पेन्झी, लाईम बटरफ्लाय आणि कॉमन मॉरमोन ही फुलपाखरे प्रेक्षकांना भेटायला आली होती.

DSC_0203

सर्व फुलपाखरांशी बोलून झाल्यावर निवेदक सर्व प्रेक्षकांना एक संदेश देतो, “……तसं बघायला गेलं तर यांच आयुष्य अवघ्या काही दिवसांचं ! किती आनंदात दिसतात ही !! त्यांच्याबरोबर आपल्याला पण आनंदी करतात. मला असं वाटतं की आपण पण आयुष्यातील संकटांना हसत हसत तोंड देत नेहमीच आनंदी राहिलं पाहिजे. “

शेवटी निवेदक आणि सर्व फुलपाखरे ‘ फुलपाखरू छान किती दिसते …… ‘ या गाण्यावर नाचतात आणि नाटिका संपते.

या नाटिकेत हिमानी फाटक, श्रावणी घाग, दिव्या धायगुडे, मानसी जाधव, देवयानी आयरे, प्रेरणा गांधी, राधिका बर्वे आणि अथर्व निजसुरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेठ सर तसेच श्री. गमरे सर व इतर सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

Butterfly event

Butterfly Slide Show & Activity at Harnai

दापोली मंडणगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या हर्णै व केळशी येथील शाळांतील विद्यार्थ्यांसाठी फुलपाखरू या विषयावरील आम्ही घेतलेल्या आजच्या  (१९ सप्टेंबर २०१४ ) कार्यक्रमाची क्षणचित्रे …

Today we conducted slide show & activity for students of Dapoli Mandangad Shikshan Prasarak Mandal’s Harnai & Kelshi schools. It was conducted at Harnai.

20140919_131306

 

20140919_131329

 

20140919_135546

 

20140919_141353

 

20140919_142638

 

Butterfly Slide Show & Activity

On 23rd July 2014 we got an opportunity to conduct a lecture on ‘Butterfly’ at our son Atharva’s school (Aadarniya Gopal Krushna Sohani Prathamik Vidyamandir, Dapoli). Being no uniform day, all the students in colour dresses appeared like colourful butterflies.

School Principal Mrs. Joshi welcomed us and briefed about the event
School Principal Mrs. Joshi welcomed us and briefed about the event

२३ जुलै हा दिवस आमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय असा ठरला. आमचा मुलगा चि. अथर्व याच्या शाळेत (आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिर, दापोली) त्याच्याच इयत्तेच्या विध्यार्थ्यांसाठी फुलपाखरू ह्या विषयावर व्याख्यान घेण्याची संधी आम्हाला मिळाली.  

Chapter about butterfly life cycle in Atharva’s 4th standard syllabus led us to the thought of conducting this lecture for all the students of his standard. Principal of his school Mrs. Swati R. Joshi showed interest when we put our thought forward to her. And  we conducted this event for these students.

There was a slide show through which students got an idea about butterfly life cycle, their behavior as well as different species of butterflies seen around Dapoli.

After the slide show we gave them an activity of making Butterfly Finger Puppet. We provided them with copies of butterfly sketch and guided them to make this puppet. The students first coloured it. Then they cut its outline with the help of scissors. With the help of a small paper ring this puppet was ready. All the students enjoyed the flying butterfly on their finger.

Prashant introducing and explaining concept of the event
Prashant introducing and explaining concept of the event

ह्या व्याख्यानाची पार्श्वभूमी अशी की जेव्हा आम्ही अथर्वच्या पाठ्यपुस्तकात फुलपाखराचे जीवनक्रम ह्या विषयावरचा धडा बघितला तेव्हा आम्हाला असे वाटले की ह्या विषयावर एक सुंदर स्लाईड शो आपण चौथीच्या मुलांसाठी करावा. आम्ही जेव्हा हा विचार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी ह्यांना सांगितला तेव्हा त्यांनाही ही कल्पना आवडली आणि २३ जुलै रोजी दुपारी हे व्याख्यान मुलांच्या व शिक्षकांच्या (श्री. गमरे सर, श्री. बामणे सर, सौ. भांबीड मेडम, श्री. शेठ सर) उत्साही सहभागात पार पडले.

All the teachers of 4th standard – Shri Gamare Sir, Shri Bamane Sir, Mrs. Bhambid Madam as well as Shri Sheth Sir – actively participated in the event. We got a very positive and encouraging feedback from the Principal as well teachers at the end of the event. We too were very happy to interact with these students who were very enthusiastic about the whole event. All of them thoroughly enjoyed the slide show as well as the finger puppet. We gave them a word maze containing words

Jilpa explaining butterfly life cycle, different species with the help of slide show
Jilpa explaining butterfly life cycle, different species with the help of slide show

related to butterfly’s life.

सुरुवातीला प्रशांतने पूर्ण कार्यक्रमाचे स्वरूप तसेच आमची भूमिका ह्या गोष्टी समजावून सांगितल्या.  त्यानंतर स्लाईड शोद्वारे फुलपाखराचा जीवनक्रम, त्यांच्या सवयी तसेच दापोली परिसरात आढळणाऱ्या काही  फुलपाखरांची झलक स्लाईड शोद्वारे मुलांना दाखवली. 

त्यानंतर मुलांना आम्ही फुलपाखरांचे एक चित्र दिले. प्रथम हे चित्र त्यांना रंगवण्यास सांगितले. त्यानंतर कात्रीने ते कापून घेऊन तसेच कागदाची रिंग बनवून ते फुलपाखरू त्यांच्या बोटावर उडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. मुलांचा उत्साह आणि आनंद फोटोमधून दिसतच आहे.  

मुलांच्या उत्साहाने सर्वांचाच उत्साह वाढवला. मुलांचा उत्साह पाहून श्री गमरे सरांनी “बटरफ्लाय” ही इंग्रजी कविता म्हणायला सुरुवात केली आणि मुले ही त्यांच्या मागून म्हणायला लागली. 

 मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांना देखील हा कार्यक्रम खूप आवडल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

फुलपाखरे हा विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही केलेला हा एक प्रयत्न होता. पाठ्यपुस्तकातील विषय अशा प्रकारे मुलांपर्यंत पोहोचवल्याने तो विषय त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजावण्यात मदत होईल असे आम्हाला वाटते.
Students colouring the butterfly
Students colouring the butterfly
Display of finger puppets by students
Display of finger puppets by students
Students with their finger puppet
Students with their finger puppet
Students showing Butterfly finger puppet prepared by them
Students showing Butterfly finger puppet prepared by them

Brochure 2013

brochure 2013

Vasundhara Mitra Award 2013

वसुंधरा मित्र पुरस्कार

Kirloskar and Vasundhara Club organize ‘Kirloskar Vasundhara International Film Festival’ (KVIFF). During this film festival national and international films on various topics of nature and environment are shown. Every year 3 ‘Vasundhara Mitra’ awards are given to persons / organizations with noticeable contribution in the field of environment.  This award is considered prestigious in the field of environment.

This year’s film festival was organised jointly by ‘Peoples’ Empowering Movement’ (PEM) and Gogate Jogalekar College from 5th to 8th December 2013. Venue was Gogate Jogalekar College Campus, Ratnagiri.

We are glad to inform you all that we are one of the recipients of this year’s ‘Vasundhara  Mitra’ Award. This award was presented to us by District Collector of Ratnagiri Mr. Rajiv Jadhav on 6th December 2013.

किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब तर्फे किर्लोस्कर वसुंधरा अंतर राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल चे आयोजन केले जाते. यंदा रत्नागिरी येथे झालेल्या फेस्टिवल मध्ये आम्हा दोघांना वसुंधरा मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिल्हाधिकारी श्री. राजीव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  ही गोष्ट आपणां सर्वांना कळवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 
 
ज्या सर्वांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली असे आमचे ग्राहक यांचे सुद्धा हे यश आहे असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर आमचे सर्व हितचिंतक, निसर्ग भ्रमणामध्ये  झालेले सर्व जण तसेच आमच्या कोयल ई-वार्तापत्राचे आपण सर्व वाचक यांच्यामुळे आम्ही इथवर पोहोचू शकलो. ह्या सर्वांना आम्ही  धन्यवाद देतो आणि त्यांच्या शुभेच्छा सदैव आमच्या बरोबर राहाव्यात अशी इच्छा व्यक्त करतो.  
 
वसुंधरा मित्रच्या निवड समितीचे आम्ही आभारी आहोत. ह्या पुरस्कारामुळे आम्ही करत असलेले हे काम अजून जास्त लोकांपर्यंत नेण्यात मोलाची मदत होईल असे आम्हाला वाटते. 
Receiving Vasundhara Mitra Award
Receiving Vasundhara Mitra Award
We feel that this is also the award of our clients who have supported our views of organic farming and plantation of native species  on their farm. Also well wishes of our nature trail participants, those who have appreciated and purchased various products developed by us, those who have visited our ‘KOEL’ centre, readers of our KOEL e-newsletter and our well wishers have helped us achieving this success.

We are thankful to the selection committee of this award for selecting us for this award. We are also thankful to reporters of various newspapers for wide coverage of this award.

For more details about this film festival you may visit their website www.kirloskarvasundharafest.in

Exhibition of Paper Cutwork Frames

Exhibition of Paper Cutwork frames (New Designs),

Bookmarks, NATURE Colouring Activity Booklet etc

Venue: Shree Preetivardhan Mangal Karyalay, Dapoli Dabhol Road, At – Jalgaon, DAPOLI (For details visit www.shreepreetivardhan.in )

Date: 12, 13 & 14 April 2013

Time: 10:00am to 8:00pm

Farming & Nature Introduction Centre Started at Anjarle

आंजर्ले गावी शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु

नमस्कार,

आमच्या आंजर्ले या गावी कोयल शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु झाल्याचे आपणास कळवताना आम्हाला आनंद होत आहे. या केंद्राचा शुभारंभ डॉ. श्री. नीरज अग्रवाल (Sr. Vice President – Vineyard Operations, SULA Vineyards, Nashik) यांच्या हस्ते दि. २८ जानेवारी  २०१२ रोजी झाला.

We are glad to inform you all that we have started “KOEL Farming & Nature Introduction Centre” at our native place – Village Anjarle. Dr. Neeraj Agarwal (Sr. Vice President – Vineyard Operations, SULA Vineyards, Nashik) did the honors by inaugurating the centre on 28th January 2012.

सन १९९९ मध्ये प्रशांत फुलशेती प्रकल्पामध्ये नोकरी करीत असताना  त्याला श्री अग्रवाल सरांबरोबर काम  करण्याची  आणि   त्यांच्या  मार्गदर्शनखाली   कृषिविषयक   प्रकल्पांच्या कार्य पद्धतीतील व्यावहारिक बारकावे समजून घेण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. या प्रसंगी आम्ही श्री. अग्रवाल सर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत.

कोयल (KOEL म्हणजेच Krishivarada Organic & Environment Learning) हे नाव आमच्या या केंद्राला ठेवण्यामागची भूमिका अशी आहे की ज्याप्रमाणे  कोयल (कोकीळ) पक्षी हा इतर पक्ष्यांच्या घरट्यात आपली अंडी घालतो त्याच प्रमाणे आम्ही आमचे पर्यावरण व निसर्ग विषयक विचार तुमच्या मनात रुजवू पहात आहोत. आम्ही अशी आशा करतो की ह्या विचारांना खतपाणी घालून त्याचा वटवृक्ष आपण सर्वजण कराल ज्यायोगे आपली पृथ्वी अधिक संपन्न होईल.

पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन विषयक जाणीव व जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही हे केंद्र सुरु केले आहे. यामध्ये निसर्गाच्या अंतरंगाची झलक दाखवणारे काही फोटो आहेत.  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी काही पेपर कटवर्क ची चित्रे देखील आहेत. यामध्ये निसर्ग भ्रमण मध्ये दिसणाऱ्या विविध घटकांची (पक्षी, प्राणी, फुलपाखरे,  कीटक, कोळी इत्यादी) आणि झाडांची थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. कोकणातील निसर्गात खूपच विविधता आहे आणि ही  जैवविविधता तसेच येथील  निसर्ग  हेच पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यामुळे आपण सर्वांनीच हा निसर्ग आणि त्यातील जैवविविधता समजून घेऊन त्याचे संवर्धन केले पाहिजे. आणि येथे येणाऱ्या पर्यटकांनीही हे पर्यटन शाश्वत पर्यटन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्व करीत असताना पर्यटक आमच्या निसर्ग भ्रमण, खारफुटी वनांना भेट,  रोपवाटिकेला भेट आणि कार्यानुभव अशा विविध निसर्ग परिचय उपक्रमात सहभागी होऊ शकतात की ज्यायोगे त्यांना निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल आणि त्यायोगे आपली निसर्ग संवर्धनाच्या दिशेने वाटचाल होईल.

अनेकजण आंजर्ले  – दापोली  आणि परिसराला पर्यटनाच्या निमित्ताने भेट देत असतात. त्यांना आता आमच्या आंजर्ले येथील केंद्रालाही भेट देता येईल. सध्या हे केंद्र शनिवार व रविवार (सकाळी ८:00 ते सायंकाळी ६:00) खुले राहील. सुरुवातीला आम्ही निसर्गविषयक दालन सुरु केले असून लवकरच शेती विषयक दालन सुरु करू. आपण आपले कुटुंबिय / मित्र / कार्यालयातील सहकारी यांना  या केंद्राविषयी कळवू शकता.

आपल्याकडून नेहमीच मिळत आलेला सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

कोयल शेती व निसर्ग परिचय केंद्र, आंजर्ले

कोठे पहाल ? : उभागर आळी, आंजर्ले गाव, तालुका दापोली

कधी पहाल ? : फक्त शनिवार व रविवार (सकाळी ८:00 ते सायंकाळी ६:00)

काय पहाल ? :  कोकणातील निसर्गाच्या अंतरंगाची झलक दाखवणारे काही फोटो (वनस्पती, पक्षी,  प्राणी,  फुलपाखरे, कीटक, कोळी इत्यादी) आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी काही पेपर कटवर्कची चित्रे.

संपर्क            : ९२२१६६१५३५ / ९३२00८९३२९

www.krishivarada.in

We know Dr. Agarwal since 1999 when Prashant was working with him in a floriculture enterprise near Pune. While working under the guidance of Agarwal Sir, Prashant got an opportunity to learn many new things related to practical insights of Agri- Enterprise. We take this opportunity to thank Agarwal Sir & his family.

KOEL stands for Krishivarada Organic & Environment Learning. Also, just as the bird Koel lays its eggs in other bird’s nest, we aim to make way for our thoughts about nature & environment into your minds and hope that you will nurture these thoughts to make our planet greener & happier.

This centre is started with the aim of creating awareness about nature and importance of conservation. In this centre glimpses of nature’s varied life forms are given in the form of photos. We have also included few paper cutwork posters giving message of environment conservation. One gets idea about various creatures and plants that can be observed on a nature trail. We all know that Konkan is reach in biodiversity. In fact Nature in this part is the main attraction for visitors / tourists. Hence we all need to understand & conserve this nature & biodiversity. It is also very important that tourists contribute their part by practicing responsible tourism. While doing so, additionally they can participate in our Nature Education Activities like Nature trail, Mangrove trail, visit to plant nursery etc. which gives them a “feel” of nature. This ultimately leads to action-oriented conservation practices.

Many tourists visit our coastal village Anjarle during holidays and week ends when they enjoy a trip to destination DAPOLI & around. They can now visit our centre at Anjarle which will remain open on Saturday & Sunday (8:00am to 6:00pm). In the initial phase Nature section is started & we will be coming with Farming section in next phase. You may inform your family members / friends / colleagues so that they can visit our centre during their Dapoli – Anjarle trip.

We thank you all for your constant support and encouragement for our Environment related activities.

KOEL farming & Nature Introduction Centre

Where to come?         :           Ubhagar Aali, Village Anjarle, Taluka Dapoli

When to visit?             :           Saturday & Sunday (8:00am to 6:00pm)

What to see?                :      Photos of glimpses of nature’s varied life forms (trees, birds, animals, butterflies, insects, spiders etc.) & few paper cutwork posters giving message of environment conservation.

Contact                    :           9221661535 / 9320089329

                                                           www.krishivarada.in