International Day of Forests 2017

Greetings on the occasion of International Day of Forests!

Shrubs, climbers, medium to large trees retained or planted in a home garden can give such forest effect. It can provide food and shelter to many creatures like insects, birds, butterflies, etc. It becomes a kind of habitat in itself in small area. Such efforts contribute to nature conservation. Every such effort – small or big – is need of time today.

Fallen leaf litter in a home garden shelters many insects which are food for birds. Such leaf litter releases nutrients in the soil upon decomposition and helps in controlling soil erosion as well as infiltration of water in the soil. One such thing in nature has multiple benefits.
We are taking efforts to create & maintain a habitat in a small place available around our house.Each of us can definitely do one such thing to sustain our own species.
आंतरराष्ट्रीय वन दिन २०१७
आपल्या घराच्या आवारात – जागेच्या उपलब्धतेनुसार – असणाऱ्या किंवा लावलेल्या झुडुपे, वेली, माध्यम तसेच मोठ्या वृक्षांमुळे जंगलसदृश परिणाम अनुभवता येऊ शकतो. हे वृक्ष अनेक सजीवांना आसरा तसेच अन्न पुरवत असल्यामुळे अशा ठिकाणी एक छोटीशी परिसंस्थाच तयार होते. या ठिकाणी अनेक प्रकारचे छोटे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक, कोळी इत्यादी पाहायला मिळतात.
या छोट्या मोठ्या झाडाझुडुपांचा जमिनीवर पडणारा पालापाचोळा तसाच राहू दिला तर तयार होणारे हे आच्छादन नैसर्गिकरित्या कुजत असताना जामिनीला अन्नघटकांचा पुरवठा तर करतेच आणि त्याच बरोबर  जमिनीची धूप थांबवून जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही वाढवते. या पालापाचोळ्यात राहणाऱ्या किंवा वाढणाऱ्या कीटक व इतर छोट्या सजीवांना खाण्यासाठी पक्षांचाही वावर वाढतो. अश्या प्रकारे वर म्हटल्याप्रमाणे जागेच्या उपलब्धतेनुसार घराच्या परिसरात असा अधिवास निर्माण केल्यामुळे किंवा राखून ठेवल्यामुळे घराजवळच्या जागेत आपण निसर्गाची झलक बघू शकतो.
हे सर्व आम्ही आमच्या घराच्या परिसरात अनुभवत आहोत. असे छोटे मोठे अनेक प्रयत्न होणे मानवाच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *