Butterfly – फुलपाखरांविषयी एक नाटिका – 6 January 2015

During Annual Day Function of Aadarniya Gopal Krishna Sohani Prathamik Vidyamandir Dapoli, a small play on Butterfly was conducted. The concept was to create and spread awareness about butterflies. The anchor introduces the theme and few butterflies come around and he talks to these butterflies and they reply to his queries. Some of them also tell about their food plants. In the end the anchor gives a message to be always happy like these colourful butterflies and take life positively.

We are thankful to the Principal of school as well as Shri Gamre Sir and other teachers for accepting this concept and for their co-operation for the success of this short play.

DSC_0202

फुलपाखरू या विषयावरील नाटिका

दिनांक ६ जानेवारी २०१५

आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी प्राथमिक विद्यामंदिराच्या स्नेहसंमेलनात फुलपाखरांविषयी जागरुकता वाढावी व काही फुलपाखरांशी लोकांची ओळख व्हावी या उद्देशाने एक नाटिका बसवण्यात आली होती.

ही संकल्पना जेव्हा आमच्या मनात आली तेव्हा आम्ही प्रथम त्याची रूपरेषा ठरवली आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांशी याविषयी बोललो. त्यांनाही ही संकल्पना आवडली. जिल्पाने या नाटिकेचे संवाद लिहीले आणि त्यात थोडेफार सुयोग्य असे बदल करून खूप कमी वेळात शाळेतील शिक्षकांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून त्याची तयारी करून घेतली.

याची संकल्पना अशी होती की निवेदक त्याच्या आगळ्यावेगळ्या मित्रांना प्रेक्षकांच्या भेटायला घेऊन येतो. हे आगळेवेगळे मित्र म्हणजे आपल्या परिसरात दिसणारी काही फुलपाखरे. या फुलपाखरांबरोबर निवेदक संवाद साधतो …… ज्यांच्या उत्तरांच्या माध्यमातून फुलपाखरे स्वतःची ओळख करून देतात. काही फुलपाखरे त्यांच्या आवडीची झाडे प्रेक्षकांना सांगतात.

यामध्ये कॉमन बेरन, ग्रास यलो, जेझेबल, प्लेन टायगर, चॉकलेट पेन्झी, लाईम बटरफ्लाय आणि कॉमन मॉरमोन ही फुलपाखरे प्रेक्षकांना भेटायला आली होती.

DSC_0203

सर्व फुलपाखरांशी बोलून झाल्यावर निवेदक सर्व प्रेक्षकांना एक संदेश देतो, “……तसं बघायला गेलं तर यांच आयुष्य अवघ्या काही दिवसांचं ! किती आनंदात दिसतात ही !! त्यांच्याबरोबर आपल्याला पण आनंदी करतात. मला असं वाटतं की आपण पण आयुष्यातील संकटांना हसत हसत तोंड देत नेहमीच आनंदी राहिलं पाहिजे. “

शेवटी निवेदक आणि सर्व फुलपाखरे ‘ फुलपाखरू छान किती दिसते …… ‘ या गाण्यावर नाचतात आणि नाटिका संपते.

या नाटिकेत हिमानी फाटक, श्रावणी घाग, दिव्या धायगुडे, मानसी जाधव, देवयानी आयरे, प्रेरणा गांधी, राधिका बर्वे आणि अथर्व निजसुरे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेठ सर तसेच श्री. गमरे सर व इतर सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

Butterfly event