January – February – March 2012

With a view to spread awareness about nature & its conservation, we are pleased to announce launch of…. Printed bookmarks of biodiversity at & around Dapoli – A set of 12 bookmarks is available which contains photos showing glimpses of biodiversity.  Nature Colouring Activity Booklet for children – In this colouring booklet, all the sketches of various components of nature are drawn by Jilpa and colour guidelines are given for each. Upon colouring the object, it will be similar to the one in nature. This will help the children relate to these components of nature.

पर्यावरण विषयक जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आपल्यासाठी २ नवीन वस्तू उपलब्ध करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. छापील बुकमार्क – (बुकमार्क म्हणजेच पुस्तकात ठेवायची खूण ) हा १२ बुकमार्कचा सेट असून दापोली परिसरातील जैवविविधतेचे फोटो घेऊन छापलेले आहेत. “निसर्गातील घटकांची चित्रे रंगवा” ही पुस्तिका. ही पुस्तिका विशेष करून मुलांमध्ये निसर्गाविषयी गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने तयार केली आहे. त्यातील सर्व चित्रे जिल्पाने स्वतः काढलेली आहेत. प्रत्येक चित्राला रंगवण्यासाठी मार्गदर्शन दिलेले आहे. रंगवून पूर्ण होणारे चित्र आणि निसर्गातील ते घटक यामधील साम्य लक्षात आल्यावर मुलांची निसर्गाच्या त्या घटकाशी ओळख होईल. Both the above mentioned articles are available with us for sale. Soon we will also be launching greeting & stickers depicting biodiversity of DAPOLI. वर नमूद केलेल्या दोन्ही वस्तू आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवकरच आम्ही दापोलीतील जैवविविधतेची झलक दाखवणारी शुभेच्छा पत्रे आणि स्टिकर्ससुद्धा उपलब्ध करून देणार आहोत.

Meet a Plant Common Name: Kumbhi कुंभी Botanical Name: Careya arborea Family: Lecythidaceae Description: Medium to large deciduous tree found in forests throughout India. Flowers are white in colour. Flowering season:  February – March हा मध्यम ते उंच वाढणारा पानगळी प्रकारचा वृक्ष आहे. त्याची पांढरी फुले फेब्रुवारी – मार्च महिन्यात दिसतात.

Nature trails (निसर्ग भ्रमण ) Further to good response for our nature trail activity, we are now planning to organize declared nature trails & mangrove walk at Anjarle. We will be interacting with the tourists on Saturday evening and taking booking of interested persons. Of course this will depend on our availability as well as response from tourists. Charges will be on per participant basis. For more details, please contact us.

आमच्या निसर्ग भ्रमण कार्यक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता आम्ही आंजर्ले गावात पूर्वघोषित निसर्ग भ्रमणाचे कार्यक्रम घेण्याचा विचार करत आहोत. यासाठी आम्ही आंजर्ले येथे राहणाऱ्या पर्यटकांशी शनिवारी सायंकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. किंवा हे पर्यटकसुद्धा आमच्या केंद्रात येऊन आमच्याशी संपर्क साधू शकतात. इच्छुक व्यक्तींची नावे नोंदवून घेवून त्यांच्यासाठी रविवारी सकाळी आंजर्ले येथे हा कार्यक्रम घेऊ. अर्थात हे आमच्या उपलब्धतेवर तसेच पर्यटकांच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. ह्याचे आमचे मानधन हे प्रति व्यक्ती असे असेल. अधिक माहितीकरिता कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

Environment Conservation (पर्यावरण संवर्धन) Turtle Festival (कासव महोत्सव) Sahyadri Nisarga Mitra Chiplun started marine turtle conservation project since the year 2002 in village Velas. Since then their consistent efforts have resulted in successful protection to nests & safe release of hatchlings in the sea. Along with this project the organization is also working in the area of conservation of vultures & white bellied sea eagle. To know more about this valuable work, you may visit www.snmcpn.in

चिपळूणची सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था २००२ पासून वेळास ह्या गावात कासव संवर्धनाचे काम करत आहे. त्यांच्या अभ्यासावर आधारित शास्त्रीय पद्धतीने लोकसहभागातून केलेल्या प्रयत्नांमुळे ते कासवांच्या अंड्यांना संरक्षण देण्यात आणि पिल्लांना सुखरूप समुद्रात सोडण्यात यशस्वी झाले आहेत. तसेच ही संस्था गिधाडे व समुद्र गरुड ह्यांच्या संवर्धनासाठीदेखील कार्यरत आहे. त्यांच्या ह्या महत्वपूर्ण संवर्धन कार्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण त्यांची वेबसाईट बघू शकता……. www.snmcpn.in