Nature education activities spreading out….

Dhayati

आम्ही सुमारे वर्षभरापूर्वी सुरु केलेला ‘निसर्ग परिचय उपक्रम’ हा विषय आता दापोली परिसरात रुजू  लागला आहे. ज्या निसर्गाच्या ओढीने सर्व जण दापोलीला येत असतात त्यांना हा निसर्ग जवळून अनुभवण्याचा आणि इथल्या निसर्गाच्या अंतरंगाची थोडीशी झलक दाखवण्याचा एक प्रयत्न आम्ही आमच्या विविध निसर्ग परिचय उपक्रमातून करीत असतो.

The concept of nature education activities that we started a year ago is taking roots in Dapoli region. It is the nature at & around Dapoli that attracts many tourists here. Through our nature education activities we try to give a feel of nature to our participants.

गेल्या वर्षात आम्हाला वेगवेगळ्या जीवनशैलीतील तसेच वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी हे कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली. ह्या सर्व लोकांची व्यावसायिक पार्श्वभूमीदेखील वेगवेगळी होती. विशेष म्हणजे ह्या सर्वांना आमचे निसर्ग परिचय उपक्रम तसेच निसर्ग भ्रमण ही संकल्पना खूपच आवडली. गेल्या वर्षभरात आम्ही २० पेक्षा अधिक निसर्ग परिचय उपक्रम घेतले ज्यात निसर्ग भ्रमण, खारफुटी वनांचा परिचय, निसर्ग चित्रकला आणि रंगभरण  तसेच रोपवाटिकेला भेट व कार्यानुभव ह्याचा समावेश आहे. ह्या सर्व उपक्रमांद्वारे आम्ही ३५० पेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचलो. ह्यामुळे आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्वजण आणि अशा कार्यक्रमांना पर्यटकांपर्यंत पोहोचवणारे दापोली परिसरातील हॉटेल व्यावसायिक तसेच सहल आयोजकांच्या सहयोगामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलो. या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

Karvanda flowers

आज मुलांना शाळेत पर्यावरण हा विषय असल्यामुळे विविध निसर्ग परिचय कार्यक्रमातून त्यांना निसर्गातील विविध घटक बघायला मिळू शकतात. हा निसर्गाचा अनुभव त्यांच्या मनात निसर्गाची गोडी निर्माण करू शकतो. त्याच बरोबर शाळेतील प्रकल्पांसाठी देखील मुलांना निसर्गामधून काही संकल्पना सुचू शकतात आणि असे प्रकल्प करीत असताना त्यापैकी काही गोष्टी दापोली भेटीदरम्यान प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे एक वेगळाच आनंदही  होतो.

During last year we got an opportunity to conduct nature trails for groups from varied lifestyle & background; including various age groups. We have reached out to the trail participants who were from different professional backgrounds. All of them enjoyed & appreciated the concept of nature trail. During last year we conducted 20+ nature education activities including mangrove trail, visit to plant nursery & hands on experience, nature colouring activity & nature trails at & around Dapoli. Through these activities we reached out to 350+ participants. This has

Indian Coral tree (Pangara)

boosted our moral. It is only because of all the participants and those hotel owners and tour operators who promoted our activities that we could achieve this. We are thankful to all of them. Our trail participants have experienced this feel of nature while enjoying their holidays at & around Dapoli in addition to the site seeing.

Now-a-days children have environment as one of the subjects in their school syllabus. While on a nature trail they get to experience and observe various components of nature. This can also give them various ideas for their project work at school. It can also lead to developing interest in nature.

The season is changing now. The cool winter days are over and temperature of the day is rising. Trees / shrubs that flower in this season are in full bloom. You can also participate in various nature education activities along with your family

Anjani

and friends during forthcoming holidays.

आता हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. या ऋतूमध्ये फुलणारी झाडे आता बहरू लागली आहेत.  विविध रंगानी बहरलेल्या  वनस्पती  – वृक्ष  वेली आणि  झुडुपे  खूपच  सुंदर  दिसातात. येणाऱ्या सुट्टीमध्ये आपण देखील आपल्या कुटुंब तसेच मित्रमंडळी बरोबर आमच्या निसर्ग परिचय उपक्रमात सहभागी होवू शकता.