Farming & Nature Introduction Centre Started at Anjarle

आंजर्ले गावी शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु

नमस्कार,

आमच्या आंजर्ले या गावी कोयल शेती व निसर्ग परिचय केंद्र सुरु झाल्याचे आपणास कळवताना आम्हाला आनंद होत आहे. या केंद्राचा शुभारंभ डॉ. श्री. नीरज अग्रवाल (Sr. Vice President – Vineyard Operations, SULA Vineyards, Nashik) यांच्या हस्ते दि. २८ जानेवारी  २०१२ रोजी झाला.

We are glad to inform you all that we have started “KOEL Farming & Nature Introduction Centre” at our native place – Village Anjarle. Dr. Neeraj Agarwal (Sr. Vice President – Vineyard Operations, SULA Vineyards, Nashik) did the honors by inaugurating the centre on 28th January 2012.

सन १९९९ मध्ये प्रशांत फुलशेती प्रकल्पामध्ये नोकरी करीत असताना  त्याला श्री अग्रवाल सरांबरोबर काम  करण्याची  आणि   त्यांच्या  मार्गदर्शनखाली   कृषिविषयक   प्रकल्पांच्या कार्य पद्धतीतील व्यावहारिक बारकावे समजून घेण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली. या प्रसंगी आम्ही श्री. अग्रवाल सर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत.

कोयल (KOEL म्हणजेच Krishivarada Organic & Environment Learning) हे नाव आमच्या या केंद्राला ठेवण्यामागची भूमिका अशी आहे की ज्याप्रमाणे  कोयल (कोकीळ) पक्षी हा इतर पक्ष्यांच्या घरट्यात आपली अंडी घालतो त्याच प्रमाणे आम्ही आमचे पर्यावरण व निसर्ग विषयक विचार तुमच्या मनात रुजवू पहात आहोत. आम्ही अशी आशा करतो की ह्या विचारांना खतपाणी घालून त्याचा वटवृक्ष आपण सर्वजण कराल ज्यायोगे आपली पृथ्वी अधिक संपन्न होईल.

पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन विषयक जाणीव व जागृती करण्याच्या उद्देशाने आम्ही हे केंद्र सुरु केले आहे. यामध्ये निसर्गाच्या अंतरंगाची झलक दाखवणारे काही फोटो आहेत.  पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी काही पेपर कटवर्क ची चित्रे देखील आहेत. यामध्ये निसर्ग भ्रमण मध्ये दिसणाऱ्या विविध घटकांची (पक्षी, प्राणी, फुलपाखरे,  कीटक, कोळी इत्यादी) आणि झाडांची थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. कोकणातील निसर्गात खूपच विविधता आहे आणि ही  जैवविविधता तसेच येथील  निसर्ग  हेच पर्यटकांना आकर्षित करत असते. त्यामुळे आपण सर्वांनीच हा निसर्ग आणि त्यातील जैवविविधता समजून घेऊन त्याचे संवर्धन केले पाहिजे. आणि येथे येणाऱ्या पर्यटकांनीही हे पर्यटन शाश्वत पर्यटन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे सर्व करीत असताना पर्यटक आमच्या निसर्ग भ्रमण, खारफुटी वनांना भेट,  रोपवाटिकेला भेट आणि कार्यानुभव अशा विविध निसर्ग परिचय उपक्रमात सहभागी होऊ शकतात की ज्यायोगे त्यांना निसर्गाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल आणि त्यायोगे आपली निसर्ग संवर्धनाच्या दिशेने वाटचाल होईल.

अनेकजण आंजर्ले  – दापोली  आणि परिसराला पर्यटनाच्या निमित्ताने भेट देत असतात. त्यांना आता आमच्या आंजर्ले येथील केंद्रालाही भेट देता येईल. सध्या हे केंद्र शनिवार व रविवार (सकाळी ८:00 ते सायंकाळी ६:00) खुले राहील. सुरुवातीला आम्ही निसर्गविषयक दालन सुरु केले असून लवकरच शेती विषयक दालन सुरु करू. आपण आपले कुटुंबिय / मित्र / कार्यालयातील सहकारी यांना  या केंद्राविषयी कळवू शकता.

आपल्याकडून नेहमीच मिळत आलेला सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहनाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

कोयल शेती व निसर्ग परिचय केंद्र, आंजर्ले

कोठे पहाल ? : उभागर आळी, आंजर्ले गाव, तालुका दापोली

कधी पहाल ? : फक्त शनिवार व रविवार (सकाळी ८:00 ते सायंकाळी ६:00)

काय पहाल ? :  कोकणातील निसर्गाच्या अंतरंगाची झलक दाखवणारे काही फोटो (वनस्पती, पक्षी,  प्राणी,  फुलपाखरे, कीटक, कोळी इत्यादी) आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी काही पेपर कटवर्कची चित्रे.

संपर्क            : ९२२१६६१५३५ / ९३२00८९३२९

www.krishivarada.in

We know Dr. Agarwal since 1999 when Prashant was working with him in a floriculture enterprise near Pune. While working under the guidance of Agarwal Sir, Prashant got an opportunity to learn many new things related to practical insights of Agri- Enterprise. We take this opportunity to thank Agarwal Sir & his family.

KOEL stands for Krishivarada Organic & Environment Learning. Also, just as the bird Koel lays its eggs in other bird’s nest, we aim to make way for our thoughts about nature & environment into your minds and hope that you will nurture these thoughts to make our planet greener & happier.

This centre is started with the aim of creating awareness about nature and importance of conservation. In this centre glimpses of nature’s varied life forms are given in the form of photos. We have also included few paper cutwork posters giving message of environment conservation. One gets idea about various creatures and plants that can be observed on a nature trail. We all know that Konkan is reach in biodiversity. In fact Nature in this part is the main attraction for visitors / tourists. Hence we all need to understand & conserve this nature & biodiversity. It is also very important that tourists contribute their part by practicing responsible tourism. While doing so, additionally they can participate in our Nature Education Activities like Nature trail, Mangrove trail, visit to plant nursery etc. which gives them a “feel” of nature. This ultimately leads to action-oriented conservation practices.

Many tourists visit our coastal village Anjarle during holidays and week ends when they enjoy a trip to destination DAPOLI & around. They can now visit our centre at Anjarle which will remain open on Saturday & Sunday (8:00am to 6:00pm). In the initial phase Nature section is started & we will be coming with Farming section in next phase. You may inform your family members / friends / colleagues so that they can visit our centre during their Dapoli – Anjarle trip.

We thank you all for your constant support and encouragement for our Environment related activities.

KOEL farming & Nature Introduction Centre

Where to come?         :           Ubhagar Aali, Village Anjarle, Taluka Dapoli

When to visit?             :           Saturday & Sunday (8:00am to 6:00pm)

What to see?                :      Photos of glimpses of nature’s varied life forms (trees, birds, animals, butterflies, insects, spiders etc.) & few paper cutwork posters giving message of environment conservation.

Contact                    :           9221661535 / 9320089329

                                                           www.krishivarada.in

 

7 thoughts on “Farming & Nature Introduction Centre Started at Anjarle”

  1. Dear, prashant & jilpa
    cograts… & best wishes… like 2 visit 2 farm , when ? don’t know.
    u’r work will help 2 get interest in farming.
    anand.

  2. Good work, really appreciate your efforts. You are very social. Looking forward to visit KOEL soon. Best of luck & keep it up.

  3. Good work, really appreciate your efforts. Looking forward to visit KOEL soon. Best of luck & keep it up.

Comments are closed.