July – August – September 2011

Monsoon season is well set in and many heavy showers show their strength and beauty. Lush green colour of the landscape everywhere fills eyes with a soothing feeling. Rainbow of monsoon flowering plants splashes during these months.  Farming activity is also at its peak.

कधी पावसाची रिमझिम तर कधी मोठया सरी…….. त्यामुळे हवेत एक वेगळाच गारवा जाणवायला लागतो. जागोजागी उगवलेल्या गवतामुळे सभोवतालचा परिसर हिरवा गालीचा अंथरल्यासारखा भासतो.  विविध रानफुलांच्या माध्यमातून निसर्ग विविध रंगांची उधळण करताना पाहून त्याचा अनुभव घ्यावासा वाटतो.

Meet a Plant

Common Name: Haldu  हेदू

Botanical Name: Haldina cordifolia (Adina c.)

Family: Rubiaceae

Description: Haldu is a large deciduous tree occasionally seen in Konkan

 Flowering season: July – August

हेदू हा जंगलातील उंच वाढणारा पानगळी प्रकारचा वृक्ष आहे. याला पावसाळ्यात पिवळ्या रंगाची फुले येतात. छोट्या गोंड्यासारखी ही फुले फारच मोहक दिसतात.

Meet a Bird

Common Name: Golden Oriole    हळद्या

Description: Golden yellow coloured bird with black wings & tail. Female is dull coloured. Found throughout the country; even in towns. Mainly feeds on insects, Ficus & other fruits.

नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा  व शेपटीचा रंग काळा असतो. मादी किंचीत फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते.   विविध फळे आणि लहान किडे हे याचे मुख्य खाद्य आहे. विणीचा हंगाम  – एप्रिल ते जुलै.

Nature trails

Monsoon has its own beauty which is beyond comparison.  One can enjoy the splendid colours of monsoon flora during this season. This is also the season when one gets to see variety of life like caterpillars, insects, butterflies, moths, grasshoppers, spiders etc.

पावसाळ्यात उगवणाऱ्या वनस्पतींबरोबरच अनेक प्रकारचे कीटक व फुलपाखरे त्यांच्या अनेकविध रंगांनी आपल्याला अचंबित करतात.  पावसाळ्यातील निसर्ग भ्रमंतीमध्ये आपल्याला हे सर्व अनुभवता येऊ शकते.

Organic Farming

Many types of vegetables can be grown during monsoon season.

Earthworms are vital components of organic farming. During monsoon, they can be seen on surfaces of soil on organic farms. Vermicompost & vermiwash are the two products which help in healthy growth of crops. Organic farming nurtures native species of earthworms.

पावसाळ्यात शेतामध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करता येते.  

गांडूळ हा सेंद्रिय शेतीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पावसाळ्यात गांडूळ जमिनीवर बघायला मिळतात. गांडूळ खतामधून पिकांना आवश्यक  असे बरेच अन्न घटक मिळतात.

Landscaping

While designing any area for enhancing its beauty we also consider its optimum utility.  The design seen in the adjacent photo was prepared for Mrs. Rashmi Luktuke, village Gavhe, Dapoli.

घरा सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण करताना विविध प्रकारची फुलझाडे व हिरवळ तसेच वनवृक्ष यांचा समावेश केलेला आहे. कुटुंबासाठी लागणारी फळे व भाजी याची गरज काही  प्रमाणात  भागविण्यासाठी फळझाडे व भाजीपाला लागवड असलेली परसबागही आहे.

 

Environment Conservation Series

Flowing muddy water is a common scene during monsoon in towns & villages. This muddy water carries with itself the fine particles of soil. This is in fact the fertile part of land which is lost by soil erosion. Suitable farming methods like bunding, contour cultivation, planting of trees and grasses can help in reducing soil erosion up to a large extent.

पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण वाहून जातात व जमिनीची धूप होते. विविध प्रकारची बांधबंदिस्ती, वृक्ष व गवत लागवड तसेच शेतीतील मशागतीची कामे उताराच्या आडव्या रेषेत केल्याने जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते.