Global Kokan 2011 (Marathi)

ग्लोबल कोकण २०११ प्रदर्शनाच्या निमित्तानं………

कृषिवरदा  – दापोली निसर्ग भ्रमण

आंजर्ले – दापोली  परिसरात येणाऱ्या पर्यटकांना इथल्या निसर्गाचा एक अनुभव देण्याचा प्रयत्न निसर्ग भ्रमण  कार्यक्रमातून  केला जातो. या कार्यक्रमात भ्रमण मार्गात असणाऱ्या वनस्पती, दिसणारे पक्षी, फुलपाखरे, कीटक, कोळी इ. ची माहिती देण्यात येते . पर्यावरण व इतर नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनाबाबत मानवाची भूमिका उलगडून सांगणे हा या निसर्ग भ्रमण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

खरंतर  कृषि  व पर्यावरण विषयक तांत्रिक सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं हा आमचा व्यवसाय. माझी पत्नी जिल्पा आणि मी गेली १० वर्ष हा व्यवसाय करीत आहोत. पण ह्या प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्ही जिल्पाच्या निसर्ग भ्रमण दापोली या कार्यक्रमाला प्राधान्याने सर्वांपर्यंत पोहोचविण्याचं  ठरवलं आणि कामाला सुरुवात केली.

जिल्पा मुळची मुंबईची. तिथे असताना तिने १९९८ सालापासून निसर्ग भ्रमणाचे कार्यक्रम व्यावसायिक स्वरुपात घ्यायला सुरुवात केली. २००७ साली दापोलीला स्थायिक झाल्यानंतर असे कार्यक्रम दापोली परिसरात आम्ही घेत होतो. पण त्याचे स्वरूप अगदी लहानसेच – म्हणजे ओळखीतून येणाऱ्या हौशी निसर्ग प्रेमी आणि अभ्यासकांसाठी निसर्ग भ्रमण – असे होते. गेले वर्षभर आम्ही या कार्यक्रमाच्या व्यावसायिक स्वरुपाची आखणी व नियोजन करीत होतो. आणि त्याच सुमारात आमची दापोलीचे प्रांत अधिकारी श्री. मंगेश जोशी यांच्याशी ओळख झाली. ते स्वतः निसर्गप्रेमी असल्यामुळे त्यांना ही  कल्पना खूपच आवडली. “दापोलीला पर्यटकांची खूपच गर्दी असते आणि आपल्या तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे पाहत असतानाच  इथल्या  निसर्गाची आणि जैवविविधतेची ओळख तुम्ही पर्यटकांना करून द्या” असे त्यांनी सुचवले.

या कार्यक्रमाचा व्यावसायिक दृष्ट्या विस्तार करण्याचा विचार मनात असतानाच श्री. जोशी साहेबांच्या भेटीमुळे आमचं मनोबळ वाढलं. मी आधीच माझ्या भावाशी काही गोष्टींची चर्चा केली होती आणि त्यानंतर आमचे दापोलीतील कौटुंबिक मित्र श्री. सौरभ बोडस यांच्याजवळ या विषयीची सविस्तर चर्चा केली आणि विशेषत्वाने त्यांच्याकडून या प्रकल्पाच्या  व्यवस्थापना विषयी  मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर जानेवारी २०११ पासून निसर्ग भ्रमण कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टीने विस्तार करायचं  निश्चित   केल.  आमची वेबसाईट तयार करणाऱ्या श्री. विक्रम कुलकर्णीबरोबर (www.vikcon.in) बोलून आणि एकत्र बसून माहितीपत्रकाचे स्वरूप ठरवून घेतलं. त्यासाठी त्याला आवश्यक  ती माहिती आणि आम्ही काढलेले फोटोही दिले.  त्याने तत्परतेने अतिशय आकर्षक असं माहितीपत्रक आणि भित्तीपत्रक तयार केलं. या माहितीपत्रकाची एका विशिष्ठ पद्धतीने घडी करता येते  की ज्यायोगे ते बघणाऱ्या व्यक्तीस ते हातात घेऊन पाहण्याचा आणि वाचण्याचा मोह टाळता येत नाही.  माहितीपत्रके  आणि  भित्तीपत्रके  छापून  झाल्यावर आंजर्ले – दापोली परिसरातील हॉटेल व घरगुती पर्यटनाची सुविधा असलेल्या काही  ठिकाणी व्यावसायिक जाहिरात करायला सुरुवात केली.

दापोली- मुरुड परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक मित्र श्री. शैलेश मोरे (www.beachresortsilversand.com) यांच्याकडून आम्हाला ग्लोबल कोकण २०११ (www.globalkokan.com) प्रदर्शनाची  माहिती मिळाली. तेव्हाच आम्ही या प्रदर्शनात सहभागी होण्याचं  निश्चित केलं. आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या (www.kokanbhumi.com) कार्यालयामध्ये जाऊन सौ. यादवराव आणि श्री. सचिन कोठारकर यांच्याशी चर्चा केली. प्रदर्शनाविषयी पूर्ण माहिती घेतली तसेच त्यादृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व  बाबींची पूर्तता करून आमचा प्रदर्शनातील सहभाग निश्चित केला.

दि. २४ ते २७ फेब्रुवारी २०११ या दिवसांमध्ये मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स  येथे झालेल्या या  प्रदर्शनात आम्हाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आम्हाला भेटणाऱ्या सर्वांना आम्ही आमचे माहितीपत्रक देत होतो. त्यापैकी बऱ्याच लोकांनी आमच्या ‘निसर्ग भ्रमण – दापोली’ कार्यक्रमाचं स्वरूप नीटपणे समजून घेतलं  आणि त्यांना ही संकल्पना खूप आवडल्याचं  आवर्जून नमूद केलं. आमच्या माहितीपत्रकातील आमची शैक्षणिक पदवी वाचून काहींनी आमच्या कृषिविषयक व्यवसायाचीही चौकशी केली. आमच्या कृषि व पर्यावरण विषयक तांत्रिक मार्गदर्शनाची  आमची कार्यपद्धती त्यांना  फारच चांगली वाटली. काहींनी आमच्या या दोन्ही उपक्रमांनी भारावून जाऊन आमचे कौतुक केले तसेच आमच्या या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.

कोकण भूमी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने आमच्यासारख्या कोकणातील उद्योजकांना जाहिरातीसाठी एक चांगलं   व्यासपीठ मिळालं. ग्लोबल कोकण या प्रदर्शनाचं नियोजन फारच चांगल्याप्रकारे केलं होतं. कोकण भूमी प्रतिष्ठानचे श्री. संजय यादवराव तसेच प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत.  आम्ही तर आमची माहितीपत्रके सर्वांना दिलीच परंतु प्रतिष्ठानने तयार केलेल्या एकत्रित माहिती पत्रकातूनही सहभागी झालेल्या व्यावसायिकांची माहिती आयोजकांनी सर्व लोकांपर्यंत पोहोचविली. अशाप्रकारे एकत्रित माहितीपत्रके तयार करण्याची  प्रतिष्ठानची संकल्पना नक्कीच स्तुत्य आहे कारण ती सर्वांना एकत्रितपणे पुढे नेणारी अशी आहे.

Organic Farming (Marathi)

शाश्वत समृद्धीकडे

सेंद्रिय शेती ही काळाची गरज तर आहेच पण नीट विचार केला तर ती शेती पद्धती ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. मृदशास्त्रामध्ये मातीला सजीव मानलेले आहे. कारण त्यात असंख्य प्रकारचे सूक्ष्मजीव व गांडुळे अविरतपणे कार्यरत असतात. आणि जमिनीवर पडणाऱ्या पालापाचोळ्याचे खतात  –  झाडाला उपलब्ध स्वरुपात –  रुपांतर  करण्याचे कार्य हे सूक्ष्मजीव व गांडुळेच करीत असतात. पालापाचोळ्यामधील  पोषक द्रव्ये झाडाला / पिकाला   वापरता येतील अशा  रुपात आणण्याचे बहुमूल्य कार्य सूक्ष्मजीव व गांडुळे करतात. त्या प्रक्रियेद्वारे निसर्ग वाळलेल्या पानात बंदिस्त असलेली पोषक द्रव्ये मुक्त करण्याचे काम किती सहजगत्या करून घेतो हे आपल्या लक्षात येईल.

हे करीत असताना त्या खतातील पोषक तत्वे वाढवण्याचं  कामही होते. जेव्हा रासायनिक घटकांचा वापर करून शेती केली जाते तेव्हा त्या रासायनिक घटकांमुळे मातीत असणाऱ्या या सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो, हळूहळू त्यांची संख्या कमी होऊ लागते……आणि मातीमधले जीवन संपुष्टात येते.  अशा वेळी माती हे पिके वाढविण्याचे केवळ एक भौतिक माध्यम उरते.

गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे हे आपण पुस्तकात वाचतो. पण शेतीमध्ये रासायनिक घटकांचा वापर करून ह्या मित्राचा सर्वनाश करून आपण उत्पादन वाढीची स्वप्ने पाहत आहोत !!!! ही स्वप्ने पूर्ण होण्याचा आपला मुलाधारच चुकीचा आहे. सेंद्रिय शेती हीच शाश्वत शेती असल्याचे विविध संशोधनातून आता सिद्ध होत आहे. ते खरं आहे कारण ते निसर्ग नियमाला धरून आहे. आपली प्रगती ही निसर्गाबरोबर चालूनच होणार आहे हे आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले  आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये मधमाश्या आणि इतर उपयुक्त कीटकांचा परागीभवन व कीड नियंत्रणासाठी उपयोग होतो. बरेच पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या किडी खावून फस्त करतात आणि त्यांना नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये पक्ष्यांनाही फार मोलाचे स्थान आहे. म्हणूनच  अशा प्रकारची शेती करणाऱ्यांनी पक्ष्यांसाठी निवारे उभारावेत ….. म्हणजेच भारतीय प्रजातीच्या विविध वृक्षांची लागवड आपल्या शेतावर करावी.

सेंद्रिय शेती करीत असताना खत म्हणून शेण, राख तसेच जमिनीवर पडणारा पालापाचोळा आणि पिकांचे अवशेष इत्यादींचा वापर करता येतो. पिकांचे किडी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी गोमुत्र, कडुलिंब तसेच इतर विविध वृक्षांच्या पानांचा वापर करता येतो. त्याच बरोबर वेगवेगळ्या पीक पद्धतीचाही वापर करता येतो. शेतीसाठी लागणारे असे विविध घटक (नैसर्गिक किवा सेंद्रिय खते, पीक  संवर्धक घटक,  बुरशीनाशके आणि कीटकनाशके  इत्यादी)  आता बाजारातही उपलब्ध आहेत. तसेच अशा शेतीचं ‘सेंद्रिय प्रमाणीकरण’ केल्याने शेतीतील उत्पन्नाला अधिक दरही मिळू शकतो.

आमची कार्यपद्धती

अशा शेती प्रकल्पामध्ये आम्ही त्याचे नियोजन, फळे आणि भाजीपाला लागवड आणि त्या पिकांची जोपासना (खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पीक  संरक्षण इत्यादी) यासाठी मार्गदर्शन करतो.
हे सर्व करताना शेतावरील दैनंदिन व्यवहारांच्या नोंदी (शेतावर होणारे काम, येणारे उत्पन्न, तसेच लागणाऱ्या सर्व घटकांच्या नोंदी इत्यादी ठेवण्यासाठी योग्य असे आराखडे ) आणि शेताचे सेंद्रिय प्रमाणीकरण याकरिता मार्गदर्शन करतो.

 • आवश्यकतेनुसार शेताला भेट देऊन मार्गदर्शन
 • भेटीच्या वेळी मागील सांगितलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा आणि आवश्यकतेनुसार पुढील कामांचे नियोजन.
 • काही कामांचे प्रात्यक्षिक – उदा. आंबा काजू इत्यादी फळ झाडांना खते देताना झाडांच्या वयाप्रमाणे आणि विस्ताराप्रमाणे गोलाकार चर (रिंग) तयार करावा लागतो. झाडाच्या विस्ताराप्रमाणे रिंगचा आकार लहान किवा मोठा करावा लागतो. याचे शेतावर प्रात्यक्षिक दाखवून त्यामागील शास्त्रीय कारण समजावून सांगितले जाते.
 • पुढील कामांसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व नियोजन.

आमच्या नियमित भेटीमुळे शेतीच्या कामामध्ये सातत्य व अचूकता टिकवता येते आणि त्यामुळे अशा प्रकल्पांची   व्यावहारिक आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून योग्य दिशेने वाटचाल होण्यास मदत होते. अर्थातच शेतीचे यश हे आपल्या प्रयात्नांबरोबरच निसर्गावर अवलंबून आहे हे लक्षात ठेवायला हवं. निसर्गाच्या विविध घटकांचा  – हवा, पावसाचे कमी / अधिक प्रमाण, वारा, थंडी, उन्हाचं  प्रमाण / तीव्रता, ढगाळ हवामान इत्यादी – पिकांच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पन्नावर परिणाम होत असतो.

Art of Paper cutwork

The art of paper cut work has been ancient art of China. It is believed that this art spread in India through China. The Chinese paper cut work includes cutting of paper in various shapes like flowers, trees, butterflies, dragons, etc. with the help of scissors or knife. These cut outs are used as decorations during their festivals. The cut outs are pasted on walls or they are put on window panes & in the night they are lit from behind.

The cut work done in India is known as Sanjhi kala. This art is limited to depicting various episodes from lord Krishna’s life. They are one-piece cutting with stencils which are cut with the help of scissors, blades or knife. Such stencils are used either directly to decorate the ground & coloured like ‘rangoli’. In case of rangoli the stencil is lifted after the colours are filled. Since this coloured rangoli is put open for public during evening, the name ‘sanjhi’ kala may have been derived; ‘sanjh’ = evening.

Golden Oriole (हळद्या)

हे चित्र एका कागदावर कापलेले आहे. त्यातील सर्व बारकावे कापण्यासाठी ऑपरेशनच्या ब्लेडचा वापर केला आहे.  असे कापून तयार केलेले चित्र दुसऱ्या रंगाच्या कागदावर  चिकटवलेले आहे.

This picture is a one-piece paper cut out that is cut on one paper and pasted on the other. All the details are depicted with the help of various shapes of cuts. It is cut with the help of surgical blade. No other medium is used.

I read about both these arts in “The India Magazine” old issues in 1994 which my father had bought from old book sellers. After reading the articles, we had discussions and he suggested to try it out with the help of surgical blade. Hence I decided to do it with the help of surgical blade with the concept of one-piece cutting and theme of birds. First exhibition of these cut outs was organized by Bombay Natural History Society (BNHS) in December 1994.

For more details about hand painted greeting cards,  book marks & paper cutwork visit

www.dapolipaperart.in

Magpie Robin (दयाळ)

Beautifying our surrounding

Beauty of flowers and flowering plants has always been admired by all of us. The wide variety of colours that nature has blessed these plants with are indeed pleasing & soothing to eyes. When these plants are planted with a certain theme / concept in any given area their beauty is enhanced manifold and give pleasure to the observer. This is what we call as landscape designing. It requires knowledge of plants as well as the skill to visualise the landscape after the plants set in.

Along with various types of plants, water bodies, pathways, arches, gazebo, children play area, etc. are incorporated in the landscape. To enjoy beauty of nature during evening time garden lights are also suggested. To relax & sit at ease in this area various types of sit outs can be prepared.

 • We suggest site visit & initial meeting – this preliminary visit is mainly to understand the area to be landscaped as well as to discuss various aspects with the client
 • Requirements / project specific needs of clients, if any, are considered during this visit. Also possibilities of those requirements to be incorporated in the landscape are discussed.
 • Expected use of green area is also important aspect of consideration while preparing design– children play area, recreational area, jogging purpose, meditation, educational activity, biodiversity conservation etc.
 • While designing, we see to it that as far as possible there will be some or other type of flowers & colours throughout the year.
 • We also give concept like bird garden and butterfly garden where in a habitat for these species is created so as to make it a natural place of residence for them.
 • While designing the area, aerial view of the design is one of the important aspects that are taken into account if the house or bungalow or building is having a terrace / balcony.
 • Retaining topographical features (wherever feasible) & existing trees, if any makes the whole area more natural.
 • Native species are incorporated in the design in addition to various ornamental plants.
 • Schematic drawing along with schedule of quantities of different plant species & execution details is prepared.
 • Civil components like walkways / pathways, sit outs, arches, gazebo, water bodies / fountains are only suggested……technical specifications are not given.
 • Need based assistance is made available on visit basis for maintenance of this landscape garden area. We also propose high / low maintenance gardens depending up on requirement of client.

Conservation through nature trails (Marathi)

निसर्ग भ्रमणातून निसर्ग संवर्धन

निसर्ग भ्रमंती मधून आपल्याला निसर्गाचा अनुभव घेता येतो. जेव्हा तुम्ही निसर्ग “अनुभवता” तेव्हा निसर्गाची गोडी तुमच्या मनात निर्माण होते. अशा भ्रमंतीचा मुख्य हेतू – मानवाचा निसर्ग संवर्धनामधील सहभाग किती आवश्यक आहे ते पटवून देणे – हा आहे. ह्या दृष्टीने विचार केला तर असे म्हणता येईल की निसर्ग भ्रमंती ही संवर्धनाकडे जाणारी पहिली पायरी आहे.

निसर्ग संवर्धन हा शब्द आज सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. पण आपल्यापैकी खूप लोकांना कदाचित असा प्रश्न पडत असेल की एक व्यक्ती म्हणून मी निसर्ग संवर्धनासाठी काय करू शकतो / शकते ? खाली दिलेल्या बाबींवरून असे लक्षात येईल की दैनंदिन जीवनात जर प्रत्येकाने छोटे छोटे बदल केले तर त्याचे फार मोठे सकारात्मक परिणाम निसर्ग संवर्धनासाठी होवू शकतात. वाचा आणि विचार करा . . . . .

वीजेची बचत – आवश्यकता असेल तेव्हाच आणि तेवढीच वीजेची उपकरणे वापरा.

पाण्याची बचत – आवश्यक तेवढंच पाणी वापरा. वाहणारे व गळणारे नळ बंद करून पाणी वाचवा.

पुनर्वापर होवू शकेल अशा गोष्टींचा वापर – उदा. प्लास्टिक पिशव्यांचा कमीत कमी वापर करा.

कागद वाचवा – शक्य असेल तिथे कागद वाचवा. अनावश्यक छपाई टाळा.

*******************

रिथिंक – पुनर्विचार करा – एखादी गोष्ट घेण्याआधी त्याच्या गरजेचा विचार करून मगच घ्या.

रिफ्युझ – परत करा / टाळा – अविघटनक्षम गोष्टींचा वापर टाळा.

रिड्यूस – कमी करा – अविघटनक्षम गोष्टींचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा.

रियुझ – पुनर्वापर – जेथे शक्य आहे तेथे पुनर्वापर करा. उदा. बाटल्या, प्लास्टिक पिशव्या ई.

रिसायकल – पुनर्प्रकियावापर – जेथे शक्य असेल तेथे वस्तून्ची पुनर्प्रक्रिया करून वापर करा.

*******************
प्रत्येकाने निसर्ग संवर्धनामध्ये आपला वाटा उचलणे ही काळाची गरज आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात केलेले छोटे छोटे बदल हे निसर्ग संवर्धनासाठी फार मोलाचे ठरू शकतात.

ह्या सर्वांचा आपल्याला तर फायदा होईलच पण त्याच बरोबर आपल्या मनात प्रचंड समाधानाची भावना देखील निर्माण होईल की आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवीगार सृष्टी ठेवू शकलो.

आपण हे पर्यावरण आपल्या पुढच्या पिढ्यांकडून उसने घेतलेले आहे आणि ते त्यांना सुस्थितीत देणे ही आपली जबाबदारी आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Nature trails DAPOLI

Nature trails – highlights of this season

A trail for teachers from Mumbai was conducted on 16th April 2011 at Kolthare – at Mr. Mahajan’s farm. This was organized by young tour entrepreneur Ms. Tejashree Joshi ( 9930629108 / 8275392314) from Mumbai.

Mr. Atmaram Parab of Isha Tours (www.ishatour.net) from Thane organised a nature camp at Dapoli. We conducted nature trails for the participants in April 2011

Camp was organized by Mr. Sandesh Soman ( SOMAN ABHYAVAHAR 9404159339) from Dapoli for the members of “Anaam Prem” Organization. They enjoyed the trail at Mauje Dapoli at Mr. Milind Sathe’s (9422443262) residence.

Scholars of Dr Homi Bhabha Fellowship Std VI interestingly participated in the trail conducted during a camp organized by Dr. Raja Dandekar (9422431275) and Mrs. Renu Dandekar (www.loksadhana.org) at Chikhalgaon.

Family of Dr. Tamhankar from Karad enjoyed a trail at Anjarle. Their keen interest and enthusiasm was indeed worth appreciating.

Group on trail
Enthusiastic trail participants learning more about birds

Message of conservation through NATURE TRAILS

Nature trail is a walk through nature where we learn about various components of nature which come across. We get to experience these components by getting to hear various bird calls, see various plants, flowers, spiders, insects, butterflies etc. I also explain about soil, air, water and environment as a whole.

Ultimate goal of such trails is to explain human beings’ role in conservation of nature & various natural resources.

In this context, nature trail is the first step towards nature conservation. Once you experience the “feel” of nature, you develop a liking towards nature. This ultimately leads towards action oriented nature conservation.

………………..ONLY YOU CAN DO THIS…………..

Every body is well aware of the term nature conservation. But many of you might be feeling as to what YOU can do as an INDIVIDUAL for conserving nature.

Following are a few small actions which if taken by individuals can make a big difference and these are such actions / activities which only YOU can do. Just go through and think……………..
Save electricity – Use electric appliances only when required
Save water – Use only as much required. Prevent losses by reducing leakage & by closing taps when not in use
Use recyclable material – As far as possible minimize the use of plastic bags
Save paper – Think twice before you print anything
Refuse – As far as possible refuse non-biodegradable material
Reduce – Try to reduce the use of non-biodegradable material
Reuse – Reuse the articles like plastic bags, empty cans, bottles, etc.
Recycle – Recycle wherever possible.
Most important of all is to Remember the above 4

It is the need of time that everyone of us contributed their share in conserving environment. If each of us makes small changes in our day to day habits & lifestyles, it will have a definite positive impact on conserving environment. This will not only benefit us but we will have a satisfaction of leaving behind a green world for our own future generations